आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ – गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टचा उल्लेखनीय सहभाग 

२१ जून, २०२५ | जिल्हा क्रीडा संकुल, धारावी, मुंबई

गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट व टीम SSKKA च्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा संकुल, धारावी येथे उत्साहात सहभाग नोंदवण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या अधिकृत निमंत्रणानुसार ट्रस्टचे सदस्य व युवा खेळाडूंनी या कार्यक्रमात सहभाग घेत विविध योगासने प्रभावीपणे सादर केली.

या विशेष प्रसंगी सौ. आंचल सूद गोयल (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी, मुंबई शहर यांनी स्वतः उपस्थित राहून योगक्रियेत सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्यासोबत जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई, क्रीडा अधिकारी दत्ता माने, अनिल घुगे, फुलचंद कराड, समृद्धी देवळेकर, निलेश गराडे, साहिल उतेकर, सोनाली गराटे, तसेच गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टचे विश्वस्त उमेश मुरकरविघ्नेश मुरकर यांनी कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली.

गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट व SSKKA च्या युवा खेळाडूंनी केलेल्या योग सादरीकरणामुळे कार्यक्रमाला वेगळेच वैभव प्राप्त झाले. या उपक्रमाच्या माध्यमातून योगासंदर्भातील जागरूकता वाढली असून, शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग ही एक महत्त्वाची जीवनशैली असल्याचे अधोरेखित झाले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या वतीने करण्यात आले.

 
GKfoundation 0