गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट, शितो रियु स्पोर्ट्स फराटे अँड किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या सहकार्याने ( जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे पत्र )
दिनांक २३ जून २०२५ रोजी जागतिक ऑलिंपिक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन काळाकिल्ला हनुमान सेवा मंडळ हॉल व महाराष्ट्र सेवा मंडळ, लालबाग येथे करण्यात आले, ज्यात विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी कराटे आणि किकबॉक्सिंग चे सराव व प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मनं जिंकली.
या विशेष प्रसंगी गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टचे विश्वस्त श्री. उमेश मुरकर व श्री. विघ्नेश मुरकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले:
“Olympic Day हा केवळ खेळ साजरा करण्याचा दिवस नाही, तर युवा पिढीत शारीरिक तंदुरुस्ती, आत्मसंरक्षण आणि जिद्दीची प्रेरणा जागवण्याची संधी असते.”
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच हा उपक्रम अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात राबविता आला. त्यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे अनेक खेळाडूंना आणि संस्थांना त्यांच्या कार्यक्षमतेची व्यासपीठे मिळत आहेत.
हा उपक्रम खेळाच्या माध्यमातून मुलांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडवणे या उद्दिष्टाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरला.
गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट सातत्याने अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि युवा वर्गात आरोग्य, शिस्त व सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे.